Friday 25 March 2016

#Pune city draught relief

सर्व शहरी जनतेस, नगरसेवकांना, आमदार व खासदार यांना नमस्कार

विदर्भ व मराठवाडय़ात भिषण दुष्काळ पडला आहे त्यामुळे गरीब व छोटे शेतकरी, शेतमजूर, लहान सहान भाजी विक्रेते, टपरीधारक, दुकानदार व
कामगार वर्ग हे पूणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, ठाणे अशा शहरात  स्थलांतरित होत आहेत.

आपल्या बायको, मुलं तसेच म्हातारी माणसे, गूरे यांच्या सह शहरात पाल, झोपडीत, खोपटात रहात आहेत.

परवाच पुणे शहरात नदीच्या पात्रात असे बरेच लोक आले होते पण पूणे म.न.पा. च्या प्रशासनाने पोलीस बळ वापरून त्यांना दोनच दिवसांत कुठेतरी हिसकावून लावले असे कळले.

मोकळ्या जागेत अतिक्रमण केले असे म्हणत त्यांना बाहेर काढले असेल.

ईतर झोपडपट्टीत राहणाऱे लोक हे मतदार असतात पण असे स्थलांतर केलेले लोक स्थानिक मतदार नसतात त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने या विषयावर आवाज उठवला नाही.  कारण मतपेटीतून मते मिळणार नव्हती. कोणत्याही पक्षाजवळ माणूसकी, दया, क्षमा नाही हे यावेळी दिसून आले.

तरी मी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगर च्या वतीने सर्व पूणे शहर नागरिकांना अवाहन करतो की आपणास असे लोक शहरात कुठे दिसले तर त्यांना शक्य तेवढी मदत करा. काही काम द्या.  जमत असल्यास रहाणे साठी जागा द्या.  शहरावर निश्चितच ताण पडणार पण माणूसकी साठी आपण तो सहन करू या.

नाना पाटेकर यांच्या अवाहनास प्रतीसाद देत आपण 15000 हजार रुपये प्रती कुटुंब देवू केलेत तसेच आता आपण सर्वांनी या विस्थापित झालेल्या आपल्याच जनतेस आधार देवूया. ईसीसने केलेल्या अत्याचारामूळे विस्थापित झालेल्या लोकांना ईतर राष्ट्रांनी मदत केली मग ही तर आपलीच माणसं.

पूणे म. न. पा. तसेच पिपरी चिंचवड महापालिकेतील  विद्यमान सर्व नगरसेवकांना तसेच सर्व खासदार,  आमदार व राजकीय पक्षांना  विनंती की अशा स्थलांतरित झालेल्या लोकांना तात्पुरता निवास उपलब्ध करून द्यावा व माणूसकी दाखवावी.

विजय सागर
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगर
9422502315

No comments:

Post a Comment